सातारा जिल्ह्याचा क्रीडा जगतात डंका; राष्ट्रीय पंच रामदास गोळे यांना ‘कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा आणि सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ सातारा जिल्ह्यातील भालेघर तालूका जावळीचे सुपुत्र आणि ख्यातनाम राष्ट्रीय कबड्डी पंच रामदास गोळे (सर) यांना रत्नागिरीत मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक बहुमानामुळे भालेघर गावासह संपूर्ण सातारा…