अतिवृष्टीचा तडाखा: बोंडारवाडीत शेतजमीनीला पडल्या मोठामोठ्या भेगा ; बोअरवेल ५०० फूट दरीत कोसळली, शेतकरी हवालदिल
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन व शेतीचे नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील धनगरवाडी (बोंडारवाडी) येथील सर्व्हे क्रमांक २/२७ मधील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने आर्थिक मदतीची मागणी…