कॅनव्हासवर उमटले स्त्रीशक्ती, शांतता आणि राष्ट्रप्रेमाचे रंग; पांचगणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सर्जनशीलतेचा अनोखा उत्सव!
पांचगणी न्यूज नेटवर्क/ प्रमोद रांजणे पांचगणी : रंग, रेषा आणि कल्पनाशक्तीची अनोखी सांगड घालत पांचगणी येथील प्रसिद्ध ‘पांचगणी इंटरनॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॅनव्हासवर समाजाला विचार करायला लावणारे अत्यंत संवेदनशील संदेश रेखाटले आहेत. शाळेच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरगृह (इंटर-हाऊस) चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि सामाजिक जाणिवेचा एक अनोखा आणि बहारदार…