जावळी तालुक्यातील काटवलीत मुसळधार पावसाने घर कोसळले; बेलोशे कुटुंब बेघर, ३ लाखांचे नुकसान!
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जावळी तालुक्याला झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका काटवली गावाला बसला असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे स्थानिक ग्रामस्थ तुकाराम श्रीपती बेलोशे यांचे राहते घर पूर्णपणे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याने बेलोशे यांचे कुटुंब…