विद्या निकेतन हायस्कूलमध्ये पोलिसांचा संवाद; ‘सुरक्षिततेचा धडा’ गिरवत विद्यार्थिनींनी शिकले सुरक्षेचे धडे
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : नेहमीच्या अभ्यासाच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थिनींना वास्तव जीवनातील सुरक्षेचे धडे देण्याच्या उद्देशाने पाचगणी येथील विद्या निकेतन हायस्कूलमध्ये विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अथर्व बिरामणे यांच्या पुढाकारातून आणि पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस कर्मचारी जाधव व अमोल…