महाबळेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: ३.२२ लाखांचे १४ मोबाईल अन् २.२५ लाखांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम मूळ मालकांना सुपूर्द
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : पर्यटनाची राजधानी असलेल्या महाबळेश्वर शहरात आणि परिसरातून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल आणि ऑनलाईन सायबर भामट्यांनी लांबवलेली लाखोंची रक्कम शोधून काढण्यात महाबळेश्वर पोलीस ठाण्याला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या अत्यंत चिकाटीच्या तांत्रिक तपासामुळे तब्बल ३ लाख २२ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल आणि ऑनलाईन फ्रॉडमधील २ लाख…