पाचगणीत केव्ह कर्मचाऱ्यांचे स्तुत्य श्रमदान; ब्रिटिशकालीन पायवाटेसह प्राचीन गुहांचा परिसर केला प्लास्टिकमुक्त!
पांचगणी, ता. 5 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाचगणीच्या प्रसिद्ध टेबललँड पठारावर एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. येथील प्राचीन गुहांच्या परिसरात आणि ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पायवाटेवर केव्ह (गुहा) कर्मचाऱ्यांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवून पर्यटकांना आणि नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा एक अत्यंत प्रभावी संदेश दिला आहे. पाचगणीचे मुख्य आकर्षण असलेल्या टेबललँड पठाराला दररोज हजारो पर्यटक भेट देतात….