श्रीराम चौकातील व्यापाऱ्यांकडून बाल वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत; ‘निर्मल दिंडी’त चिमुकल्यांना फराळ व खाऊचे वाटप
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांचगणी शहरात निघालेल्या ‘निर्मल दिंडी’तील बाल वारकऱ्यांचे श्रीराम चौकात स्थानिक व्यावसायिकांनी अत्यंत आदराने आणि उत्साहात स्वागत केले. भक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देत निघालेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सर्वांना खाऊ व फराळाचे वाटप केले. नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी निर्मल दिंडीच्या…