तायघाटचा सुपुत्र सुहास भिलारे ठरला गावातील पहिला वकील! एलएलबी परीक्षेत घवघवीत यशाबद्दल शिवसेना व ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
पांचगणी न्यूज नेटवर्क भोसे : दुर्गम व निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या तायघाट (ता. महाबळेश्वर) या छोट्याशा गावातील गुणी सुपुत्र सुहास भिलारे याने एलएलबी (LLB) परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत वकिलीची पदवी प्राप्त केली आहे. तायघाट गावातील पहिला वकील होण्याचा मान पटकावून सुहासने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिवसेना आणि परिसरातील ग्रामस्थांच्या…