भोसे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हसू; माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
पांचगणी न्यूज नेटवर्क भोसे : शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना शालेय प्रवासाच्या सुरुवातीलाच योग्य प्रोत्साहन मिळावे या सामाजिक भावनेतून भोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक विशेष उपक्रम पार पडला. माजी केंद्रप्रमुख तथा शिवसेनेचे महाबळेश्वर तालुका प्रमुख संभाजी भिलारे यांच्या वतीने इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप…