महाबळेश्वर तालुक्यात निसर्गाचे तांडव: मुसळधार पावसामुळे नावली गावावर भू-स्खलनाचे सावट, जमीन खचल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर, ता 4 : पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वरच्या पर्वतरांगांमध्ये सध्या निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत महाबळेश्वर तालुक्यात तब्बल २५० मिलिमीटरहून अधिक विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या, नाले आणि धरणे ओसंडून वाहत असतानाच, डोंगराळ भागातील गावांना मात्र भू-स्खलनाचा आणि जमीन खचण्याचा मोठा धोका निर्माण…