‘काखेला कळसा, गावाला वळसा’; सातारा बसस्थानकाच्या गलथान कारभारावर प्रवासी आक्रमक
दोन वर्षांपासून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांच्या खिशाला डबा; अस्वच्छता आणि सोयी-सुविधांच्या अभावामुळे संतापाची लाट पांचगणी न्यूज नेटवर्क /जितीन वेंदे कुसुंबी : जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र आणि रोज हजारो प्रवाशांचे आश्रयस्थान असलेले सातारा बसस्थानक सध्या प्रशासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थेचे केंद्र बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एसटी प्रशासनाकडून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांवर extra भाड्याचा आर्थिक भुर्दंड…